Gamesएटापल्ली तालुका

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कबड्डी व व्हॉलीबाल सामन्याचे उदघाटन..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

एटापल्ली : तालुक्यातील नारानूर व रेंगावाही येथील जय महादाखंडी क्रीडा मंडळ नारानूर व रेंगावाही यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या दोन्ही सामन्याचे उदघाटन जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची गावात आगमन होताच येथील नागरिकांनी आदिवासी रेला नूत्य सादर करत ढोल व ताशाने त्यांची जंगी स्वागत केली .कंकडालवार यांनी सामन्यांचे उदघातनापूर्वी प्रथम सप्तरंगी ध्वजाचा ध्वजारोहन करून आदिवासीचे जंननायक भगवान बिरसा मुंडा आणि स्त्री शिक्षणाचे जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं प्रतिमांना पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

या दोन्ही सामन्यांचे उदघाटक म्हणून आविसं व काँग्रेसचे नेते , माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे नेते व सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी व आविसं तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मट्टामी होते.सहउदघाटक म्हणून आविस तालुका सचिव प्रज्वलभाऊ नागूलवार व ग्रामपंचायत सदस्य रमेशभाऊ वैरागडे होते.या दोन्ही सामान्यांसाठी प्रथम पुरस्कार हे जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून ठेवण्यात आले.

या उदघाटन समारंभाला मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,स्वप्नील मडावी,चिंटू आत्रामसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी ,खेळाडू,मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close