सामाजिकसिरोंचा तालुका

सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षाकडून पत्रकारांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क..

सिरोंचा ..दरवर्षी ०६जानेवारी ला बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा केला जातो. या पत्रकार दिनानिमित्त तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार गट) कडून पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. राज्याचे कॅबिनटमंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांचा प्रेरणेने व जि.प.चा माजी अध्यक्षा भाग्यश्री हलगेकर(आत्राम) युवा नेते ऋतुराज हलगेकर यांचा निर्देशानुसार सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून सिरोंचा शहर व तालुक्यातील पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर सत्कार कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा कृ.उ.बा.समितीचे संचालक रवि राल्लाबंडीवार तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,लोकमत न्यूजनेटवर्कचे पत्रकार नागभूषणम चकिनारपुवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष मादेशी मदनय्या,चिलकामारी सत्यनारायण,रवि सुल्तान, सिद्दिक भाई, आदिंची उपस्थिती होती.

सदर कार्यक्रम ना.धर्मराव बाबा यांचा सिरोंचातील बंगल्यातील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम बेज्जनीवार यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवि राल्लाबंडीवार यांनी मार्गदर्शन करुण उपस्थितांचे आभार मानले.सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन पत्रकारांच्या सत्कार घडवून आणल्याने उपस्थित पत्रकारांनी या कार्यक्रमाप्रती समाधान व्यक्त केले. यावेळी डिजिटल मिडिया व प्रिंट मीडियाचे पत्रकार बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close