भामरागड तालुकासामाजिक

भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील नागरिकांनी मांडल्या जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्यासमोर अनेक समस्या….!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

भामरागड : तालुक्यातील आरेवाडा येथील आविसं व काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आरेवाडाया गावाला भेट दिली असता या भेटीत येथील नागरिकांनी त्यांच्यासमोर गावातील नाली – रस्ते – आरोग्य सुविधा – शिक्षण असे अनेक महत्वपूर्ण समस्या मांडले असता प्राधान्यक्रमाने येथील समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे ग्वाही अजयभाऊ कंकडालवार यांनी गावकऱ्यांना दिले.

यावेळी आरेवाडा येथील नागरिकांनी आमच्या गावातील समस्या आपण दूर कराव म्हणून आविसं व काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना विनंती केले.त्यावेळी अजयभाऊंनी आपल्या गावातील प्रत्येक समस्या लवकरत लवकर दूर करण्यात येईल असे आश्वासन दिले.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून समस्या सोडवणुकीचे आश्वासन मिळाल्याने बैठकीला उपस्थित नागरिकांनी अजयभाऊंची आभार मानले.

आरेवाडा येथील बैठकीला सुधाकर तिम्मा आविस अध्यक्ष भामरागड,लालसू आत्राम माजी सभापती,शामराव येरकलवार,झुर पुंगाठी,कालू पुंगाठी,जगदीश कोकमुठीवार,सुकाम मडावी माजी सभापती पं.स.,आकाश मोगरकर,प्रवीण मोगरकर,सरिता वाचामी सरपंच ग्रामपंचायत आरेवाडा,रंजना पुंगाठी उपसरपंच ग्रामपंचायत आरेवाडा,निलाबाई कुमरे ग्रामपंचायत सदस्य आरेवाडा,सूनदा लठार ग्रामपंचायत सदस्य,निर्मला सडमेक ग्रामपंचायत सदस्य,बाजीराव तेलामी ग्रामपंचायत सदस्य,विजय कुडयामी,गोविंद चेक्रवर्ती,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मारपाल्ली,स्वप्नील मडावी,सचिन पांचार्यसह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close