अहेरी तालुका

बिबट्याच्या हल्ल्यात कोलपल्ली येथील महिला जखमी

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क… अहेरी..

📝अहेरी तालुक्यातील कोलपली या गावातील महिला मैनाबाई शामराव सड़मेक हि काल स्वतःच शेतात कापूस लावून असल्याने कापसाच्या देखरेख करण्यासाठी ती स्वतःव आठ महिन्याचा मुलासह शेतात राखण करत असतांना अचानकपणे बिबट्या कापसाच्या जुडुपातून येवून सदर महिलेवर व मुलावर झडप मारून हल्ला केला असता यात महिला व मुलाला पाठीवर व पायांवर हल्ला केल्याने गंभीर जखमी झाले होते.प्रसंग सावधानीने तिने बिबट्याच्या तावडीतून सुटले असून सदर महिलेला ला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आई व मुलांवर उपचार करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपजिल्हा रुग्णलयात जाऊन बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले आई व मुलाची भेट घेऊन त्यांची तब्यातीची आस्थेने विचारपूस केले. व घटनेबद्दल त्यांच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून जखमींना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली.तसेच वनविभागाकडुन आवश्यक आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करू असे सांगितले.यावेळी माजी जि.प.सदस्य अजयभाऊ नैताम , नगरसेवक प्रशांत गोडसेलवार व वनविभागाचे कर्मचारी आणि जखमींचे नातेवाईक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close