सिरोंचा येथील शीतल माता मंदिराचे पुजारी लक्ष्मीनारायण संगेम यांचा मूलकला फाऊंडेशन कडून सत्कार…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा : संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागलेल्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला राज्याच्या शेवटच्या
टोकावरील सिरोंचा येथील शीतल माता मंदिराचे पुजारी
लक्ष्मीनारायण संगेम यांना अयोध्येतील राममंदिर प्रशासनाने 22
जानेवारी २०२४ ला राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळालेलं आहे.
लक्ष्मीनारायण राजमल्लू संगेम हे सिरोंचा शहराचे ग्रामदेवता पोचम्मा देवी (शीतल माता) मंदिराचे पुजारी आहेत. पुजारी संगेम यांचा नेहमी धार्मिक कार्यात पुढाकार असतात. त्यांची ही तळमळ लक्षात घेऊन तालुक्यातून त्यांना राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी राममंदिर कमिटीने दिलीआहे.
याची माहिती मिळताच सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात नेहमी समोर असणारे मूलकला फाउंडेशनचे प्रमुख सागर भाऊ मूलकला यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे कार्यकर्ते राजकुमार मूलकला, उदय मूलकला, राजम मूलकला, विनोद नायडू यांच्या सह सामाजिक कार्यकर्त्यांनी पुजारी लक्ष्मीनारायण संगेम यांच्या भेटवस्तू व शाल श्रीफळ देऊन सत्कार घडवून आणली आहे.