अखेर’त्या’ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाचे आरआरटी पथकाला आलंय यश..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी / मुलचेरा : तालुक्यातील मथुरानगर व कोडसापूर आणि चिंतलपेठ येथील दोन महिलांवर नरभक्षक वाघाने हल्ला करून ठार केले.त्या नरभक्षक वाघामुळे मूलचेरासह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करणे आवश्यक असून वनविभागाने योग्य पाऊल उचलून या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची इशारा जि.प.माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,आविस व काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी यांनी वनविभागाला दिले होते.या मागणीची व इशाऱ्याची तात्काळ दखल घेऊन अखेर त्या नरभक्षक वाघाला वनविभागाचे आरआरटी पथकाने जेरबंद केल्याने वनविभागचे अधिकारी व आरआरटी पथकाचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आभार मानले आहे. त्या नरभक्षक वाघामुळे मूलचेरासह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरणात पसरले होते.शेतकरी व नागरिकांची या भयावह परिस्थितीला ओळखून या समस्याची तात्काळ उपाय करण्यासाठी योग्य पाऊल उचलल्या बद्दल मुलचेरासह परिसरातील शेतकरी व नागरिकांनी जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार
व सेवानिवृत्त अधिकारी हनमंतू मडावी यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात डॉ.आर.एस.खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव)ता. अं. व्या. प्र. चंद्रपूर तथा आरआरटी प्रमख ए.सी.मराठे, पोलीस नाईक,(शुटर)ता. अं. व्या. प्र. चंद्रपूर,.
आरआरटी.सदस्य
दिपेश.डि.टेंभुर्णे
योगेश. डि.लाकडे,
गुरुनानक वि.ढोरे वसीम.ऐन.शेख
विकाश.एस.ताजने
प्रफुल.एन.वाटगुरे
ए. डी. कोरपे आर.आर. टी.वाहनचालक
ए. एम. दांडेकर आर.आर.टी.पथकाचे
वाहनचालक कर्मचाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले.