अहेरी येथे 24 फेब्रुवारीला ओडेवार समाज बांधवांच्या जिल्हास्तरीय प्रबोधन मेळाव्याचे आयोजन…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
रवी सल्लमवार
सिरोंचा …आजच्या जागतिकीकरणाच्या युगात ओडेवार समाज हे आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या खूप मागासलेला आहे.या समाजातील शेकडो युवक-युवती शिक्षणापासून वंचित आहेत.या समाजात शैक्षणिक क्रांती घडवून आलेलं नाही.म्हणून ओडेवार समाजातील लोकांनी आपल्या पाल्यांना मासेमारी या पारंपारिक व्यवसायापासून दूर ठेवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणन्यासाठी समाज प्रबोधनाची आवश्यकता असल्याने अहेरी उपविभागातील ओडेवार समाज बांधवांच्या समाज प्रबोधन मेळाव्याची अहेरी येथे 24 फेब्रुवारीला आयोजन करण्यात आलेली आहे. अहेरी उपविभागात ओडेवार समाजाची संख्या लक्षणीय असून मूलभूत गरजांसह विकासापासून कोसो दूर आहे.केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभापासून हा समाज वंचित आहे.शिक्षणाअभवी ओडेवार समाज आजसुद्धा एकसंघ नाही आहे. शिक्षणाअभावी समाज विखुरला गेला आहे.ओडेवार समाजातील लोकांनी मासेमारीच्या हंगामात आपल्या मुलांना नदीघाटावर सोबत न नेता त्यांना शाळेतच पाठवावे,तसेच समाजातील उद्भवणाऱ्या शैक्षणिक समस्या,आर्थिक व सामाजिक एकजुटता आणि समाजातील विविध समस्यांवर निवारणासाठी समाज प्रबोधन मेळाव्याची आयोजन अहेरी येथील इंडियन पॅलेस फंक्शन हॉल मध्ये करण्यात आलेला आहे. या समाज प्रबोधन मेळाव्याला अहेरी उपविभागातील अहेरी,सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या पाचही तालुक्यातील ओडेवार समाजाचे समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाज प्रबोधन मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन ओडेवार समाजाचे शंकर पानेम यांनी केले आहे.