जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून वांगेपल्ली येथील तुमडी कुटुंबाला आर्थिक मदत..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली येथील नागरिक किशोर किस्टय्या तुमडी यांचा अचानकपणे दि.18/02/2024 ला निधन झाले होते.आणि त्यांच्या घराची परिस्तिथी अत्यंत दयनीय असून त्यातच त्यांचे वडील सुद्धा काही वर्षां मरण पावले होते.अश्याप्रकारे अनेक संकटात तुमडी कुटुंबीय सापडले होते.मृतक किशोर तुमडी यांच्या 23/02/2024 ला तेरविचा कार्यक्रम असल्याने मृतकाच्या घरात कोणीही कर्ता पुरुष नसल्याचे आणि त्यांची घराची परिस्तिथी अत्यंत हलाकीची असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांना कडून मिळताच वेळेचे विलंब न करता आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी ग्रामपंचायत वांगेपल्ली सरपंच व सदस्यांना पाठवून तेरवीच्या कार्यक्रमासाठी मृतकाच्या मातोश्रीकडे आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आला.
मृतक किशोर तुमडी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करतांना दिलीप मडावी सरपंच वांगेपल्ली,राजेश कोतपल्लीवार उपसरपंच वांगेपल्ली,संजय आत्राम ग्रामपंचायत सदस्य,निलेश आलाम ग्रामपंचायत सदस्य,संतोष येरमे,कल्पनाताई मडावी ग्रामपंचायत सदस्या,गोपाल सिडाम,सविता सिडाम,सीताराम सिडाम,महेश नैतामसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते