सुंदरनगर येथील बिनोत दास यांच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
◆मूलचेरा◆ : तालुक्यातील सुंदरनगर येथील शालेय विद्यार्थिनीं कु.जयंती दास ही गंभीर आजाराने ग्रस्त असून डॉक्टरांनी शस्त्रकिया करण्याचा सल्ला दिला असून घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे,शस्त्रकिया करण्यास अडचण होत आहे.ही बाब सुंदरनगर येथील पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या लक्षात आणून दिल्यावर,लगेच कु.जयंती दास यांच्या कुटुंबियांना घरी बोलावून तब्बेतीची विचारपूस करून माजी जि.प.सदस्या सौ.अनिताताई दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केले.
या वेळी बिनोता दास,रामेन सरकार,आविस पदाधिकारी दिनेश बहादूर,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,जुलेख शेख,प्रवीण रेषे,विनोद कावेरी,सुधाकर कोरेत,संदीप बडगे उपस्थित होते.
शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केल्याने दास कुटुंबीय माजी आमदार दिपकदादा आत्राम व माजी जि.प.सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले.