अखेर वेलगुर येथे शीतल माता मंदिर बांधकामाला सुरुवात..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : तालुक्यातील वेलगुर या गावाला काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद तथा अहेरी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मागील आठवड्यात दौरा करून गावात एक बैठक घेऊन गावातील नागरिकांसोबत विविध समस्यावर चर्चा केले होते.
या चर्चादरम्यान येथील गावकऱ्यांनी विविध समस्या मांडण्यात आले होते.त्यानंतर गावातील नागरिकांनी गावात शीतल माता मंदिर नसल्यामुळे समाज बांधवाना धार्मिक पूजा-अर्चना कार्यक्रम घेण्यासाठी अडचण भासत आहे.त्यामुळे आपण स्वतः पुढाकार घेऊन गावांसाठी शीतल माता मंदिर बांधून देण्यात यावी म्हणून त्यांना साकडे घातले असता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील नागरिकांना शब्द दिले होते.वेलगुर गावासाठी माझ्या स्व:खर्चतून शीतल माता मंदिर बांधून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.
वेलगुर येथील गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार शीतल माता मंदिराची प्रत्यक्ष बांधकामाला सूरवात झाल्याने या बांधकामाची पाहणी आज काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन या बांधकामाची पाहणी केली.यावेळी येथील गावकऱ्यांनी कंकडालवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्व: खर्चाने गावासाठी मंदिर बांधकाम करून देत असल्याने त्यांचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले.
शीतल माता मंदिर बांधकामाची पाहणीदरम्यान कंकडालवार यांचे समवेत अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीता चालूरकर,अशोकभाऊ येलमुले माजी सरपंच,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्या,स्वप्नील भाऊ मडावी,प्रशांत गोडसेलवार,पूनेश कदीकुनिवर,अनिल आत्राम,अक्षयभाऊसह स्थानिक आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.