जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धांचे उदघाटन…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील पिडींगुडाम येथील जय माँ काटीवेली पिंडीगुडम तर्फे प्रोढ ग्रामीण व्हॉलीबॉल व कब्बडी स्पर्धेचे आयोजित केली आहे.सदर या दोन्ही स्पर्धांची आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आला होता.
या कब्बड्डी व व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक ठेवण्यात आली आहे.उदघाटनाला सुरुवात करतांना सर्व प्रथम भगवान बिरसा मुंडा ,शहीद क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके, माता सरस्वती यांच्या फोटोंना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांची गावात आगमान होताच येथील नागरिकांकडून ढोल ताशाने जंगी स्वागत करण्यात आली.
या स्पर्धा कार्यक्रमाचे सहउदघाटन म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसनेते प्रज्वलभाऊ नागूलवार ,पिडींगुडाम गाव पाटील वंजा तलांडी ,कुल्ले तलांडी, जि.प.प्राथमिक व्यवस्थापक पिडींगुडाम जोगेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उदघाटन सोहळ्याला महेश बिरमवर,बंडू तलांडे,महरू तलांडे,गाव भूमिय,सुधाकर टिम्मा,निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली,कवडूजी चल्लावर,प्रज्वलभाऊ नागुलवार सचिव तालुका एटापल्ली काँग्रेस नेते,जयांद्र पवार.सभापती आ.वी का.जरावांडी,सुधाकर टेकाम,उपसरपंच जरावंडी,सुधाकर गोटा वेन्हारा इलाका अध्यक्ष एटापल्ली,मरपल्ली माजी उपसरपंच कार्तिकभाऊ तोगम,सचिन पंचर्या,चिंटू,दिवाकर तलांडीसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.