गडचिरोली जिल्हाराजकीय वृत्त
गडचिरोली येथे मविआचे लोकसभेचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन ..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… गडचिरोली..
गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांच्या गडचिरोली येथील मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पार पडला.या प्रचार कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रमाला उमेदवार डॉ.किरसान,आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार ,बंडोपंत मल्लेलवार,अतुलभाऊ गण्यारपवार,सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.