अहेरी तालुकाधार्मिक कार्य

आल्लापल्ली येथील शीतल माता व मुत्यालम्मा देवी बोनालु उत्सवाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

आलापल्ली:आलापल्ली येथे गाव अस्तित्वात आले तेव्हा पासून भामरागड रोड वरील तलावाच्या पारिवर पोचम्मा माता मंदिर (शीतल माता) असून कित्येक वर्षांपासून या मंदिराचे दुरुस्ती करण्यात आले नव्हते म्हणून या वेळी आलापल्ली गाववासीयांकडून त्या मातामंदिराचे दुरुस्ती करून दोन दिवसीय बोनालू च्या कार्यक्रमाचे आयोजन करून देवी देवतांचे गंगास्नान करून विधीवत पूजा करून शितल माता व मुत्यालम्मा देविंची स्थापना करण्यात आले. या पोचम्मा माता बोनालू कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सह माजी जिल्हा परिषद सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते विधीवत पूजा करून आलापल्ली गाववासीयांनी बोनालू चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
या पोचम्मा माता बोनालू कार्यक्रमाला आलापल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती लक्ष्मणजी गंजीवार,आशालू तोगरवार,माजी सरपंच दिलीप गंजीवार, चंद्रशेखरजी तोबंर्लावार,मदन भूपेल्लीवर,व्यंकटी कोकुलवार,मुत्यालु पोचमपल्लीवार,तंटामुक्त अध्यक्ष सुरेशजी गड्डमवार,रमेश मडावी,लक्ष्मण चकिनारपवार,हेमंत पुल्लीवार,तिरुपती इरकीवार,विलास इरकिवार,विनोद सल्लम,दिपक तोगरवार,माजी सरपंच विजय कुसनाके,विनोद कावेरी,अंकुश दुर्गे,महेश सडमेक,किशोर कामथे,रमण जुट्टूवार,नागेश रेड्डी,सिल्व्हिस्टर सल्लम,विक्टर सल्लम,राजअनिल पोचमपल्लीवार,रवी चेर्लावार सह आलापल्ली गावातील पुरुष व महिला मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close