राजकीय वृत्तसिरोंचा तालुका

इंडिया आघाडी सत्तेत आल्यास विकास कामांची श्रीगणेशा हे सिरोंचा शहरापासूनच सुरुवात करणार…ना.विजयभाऊ वडेट्टीवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा : तालुका हे राज्याचे शेवटचं टोक आहे.या तालुक्यात अनेक प्रकारचे नैसर्गिक साधन संपत्ती आहे.आजपर्यंत या साधन संपत्तीवर आधारित उद्योग धंदे इथे उभारले असता येथील बेरोजगारांना नियमित रोजगार मिळाले असते.या तालुक्याची चित्र बदलले असते परंतु याकडे अहेरीचे घराण्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या तालुक्याची आजही पाहिजे त्याप्रमाणात विकास घडून आलेलं नाही,तालुक्यातील जनतेनी येत्या 19 एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणुकीत गडचिरोली – चिमूर या लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांना साथ देऊन मताधिक्य देत निवडून दिल्यास व केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास विकास कामांची पर्व हे ऐतिहासिक सिरोंचा शहरापासून सुरू करणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते  ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिली.

ते सिरोंचा येथे काल इंडिया आघाडीकडून जुना मच्छी मार्केटच्या खुल्या पटांगणावर आयोजित लोकसभा निवडणुकीचे प्रचार सभेदरम्यान समस्त मतदार बंधू-भगिनींना ग्वाही दिली.

सिरोंचा येथे आयोजित प्रचारसभेला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान,काँग्रेस पक्षाचे मुख्य समन्वयक अजयभाऊ कंकडालवार,काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी,माजी आमदार पी.आर.तलांडी,महिला नेत्या सुगुणाताई तलांडी,बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला,मंदा शंकर,काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जावजी,काँग्रेस नेते बानय्या जनगाम,राईल्ला पापय्या,ब्रह्मनंदम कोत्तागट्टू,माजी सभापती जयसुधा जनगम,माजी जि.प.सदस्या सरिता तैनेनी,शेख दीदी,महिला जिल्हा उपाध्यक्ष नीता तलांडी,तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, आविस अध्यक्ष बानय्या जंनगाम,राकॉचे फाजील फाशा,सागर मूलकलासह  काँग्रेस व इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रचार सभेला पुढे संबोधित करतांना ना.वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणातून केंद्र व राज्य सरकारच्या वेळकाढूपणा धोरणावर गंभीर टिका करत लोकशाही व संविधानाचे रक्षणासाठी इंडिया आघाडीचे उमेदवाराला मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या भाषणात महागाई,शेतकरी विरोधी धोरणांवर प्रकाश टाकत मोदी सरकारला सत्तेतून उखडून टाकण्यासाठी आघाडीचे उमेदवाराला मताधिक्याने निवडून देण्याचे मतदारांना आवहान केले.अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या  भाषणाला तेलुगु भाषेतुन करत येथील मतदारांवर प्रभाव पाडण्याचे पुरेपूर प्रयत्न केले.

या प्रचारसभेत इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान व काँग्रेसचे महिला नेत्या सगुणाताई तलांडी यांनीही आपल्या भाषणात केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केले.

            प्रचार सभेला इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्तागण मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रचार सभेला नागरिकांची उपस्थिती ही लक्षणीय होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close