लढाई किरसानांची…परिक्षा मात्र कंकडालवारांची…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क.. सिरोंचा प्रतिनिधी…. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ.नामदेवराव किरसान यांच्यासाठी ही निवडणूक असले तरी अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांच्यासाठी मात्र ही निवडणूक दिवसेंदिवस परिक्षेची ठरू लागलंय. कारण लोकसभेची निवडणूकीची लढत विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांमध्ये सरळसरळ अहेरीचे दोन्ही घराणे विरुद्ध इंडिया आघाडीचे समन्वयकातच होण्याची सध्या तरी तसे चित्र निर्माण होतांना दिसू लागलय.म्हणूनच ही निवडणूक काँग्रेसचे समन्वयक कंकडालवार यांच्यासाठी परीक्षेची ठरू लागलंय.
अहेरी विधानसभा क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकांची दांडगा अनुभव असलेले आणि या क्षेत्रातील शोषित,वंचित व पीडितांची सेवाभावी वृत्तीने पिढा उचलणारे सर्वसामान्य जनमानसात खरे समाजसेवक म्हणून आपली प्रतिमा उमठवणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडे अहेरी विधानसभा क्षेत्राची समन्वयक नावाचं महत्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपविली. विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्षाची संघटन बोटावरचीच होती.याची जाणीव काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना चांगल्याप्रकारे असल्याने काँग्रेस पक्षाने कंकडालवार यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी सोपविली.
काँग्रेसचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवारांसमोर आज विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील स्व:पक्षाचे कार्यकर्त्यांसह मित्रपक्षाचे कार्यकर्त्यांना सुद्धा प्रचार कार्यात लावणे तसेच इंडिया आघाडीचे उमेदवाराला विधानसभा क्षेत्रातून मताधिक्य मिळवून देणे हे दोन्ही जबाबदारी आहेत. इंडिया आघाडीचे उमेदवाराची नामांकन दाखल झाल्यापासून तर आजपर्यंत कंकडालवार यांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्र पिंजून काढल्याची माहिती समोर आली आहे.तसे कंकडालवार यांचे निवडणूक असो किंवा नसो त्यांचे नियमित दौरे कार्यक्रम सुरूच असतात.सर्वसामन्यांसह विविध संकटात सापडलेल्यांसाठी त्यांचे एक हात मदतीचे सामाजिक कार्य त्यां
नी निरंतर सुरूच ठेवले आहे.
एकंदरीत अहेरी विधानसभा क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून सेवाभावी अजयभाऊ कंकडालवार
यांच्याकडून सुरू असलेल्या सामाजिक
कार्याची
पावती
जर मतदानरुपी इंडिया आघाडीचे उमेदवाराला मताधिक्य
रूपाने मिळाल्यास यात कोणालाही
नवल वाटू नये....!