महायुतीचे उमेदवार अशोक नेतेंची हॅट्रीकाला अहेरी विधानसभेतून तर ब्रेक लागणार नाही ना…?
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा ...प्रतिनिधी.... गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचं समावेश असून या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असे थेट लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. या लोकसभा क्षेत्रात महायुतीकडून विद्यमान खासदार अशोक नेते हे तिसऱ्यांदा तर इंडिया आघाडी कडून डॉ.नामदेवराव किरसान हे पहिल्यांदाच आपले नशीब अजमवित आहे.
गडचिरोली -चिमूर या लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक असले तरी या निवडणुकीची खरी रंगत मात्र अहेरी विधानसभा मतदारसंघात रंगू लागलंय.या मतदारसंघात महायुतीचे उमेदवाराचे बाजूने अहेरीचे आजी-माजी मंत्री
सह भाजपचे कार्यकर्ते प्रचाराची धुरा संभाळत आहेत तर इंडिया आघाडीचे उमेदवाराची बाजू
मात्र माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कंकडालवार यशस्वी धुरा संभाळत आहे. दोन वेळा मोदी लाटेत निवडून आलेले
महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांना यंदा मात्र अहेरी विधानसभा मतदारसंघात मोदी व स्वतःच्या विरोधी लाटेची सामना करावं लागणार असल्याची जाणकारांची मत आहे.तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे डॉ.किरसान यांना
या
मतदारसंघात अजयभाऊ नावाचं यशस्वी रेडिमेड राजकीय चेहरा
मिळाल्याने तसेच विधानसभा क्षेत्रात मोदी व नेते
चया विरो
धात विरोधी लाट
असल्याने याची फायदा
डॉ.किरसान यांना होणार
असल्याची
सगळीकडे
अंदाज बांधण्यात
येत
आहे.
अहेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांमध्ये प्रचाराची योग्य नियोजन नसल्याचे त्यांच्या प्रचार शैलीवरून दिसून येत आहे.
तसेच खासदार अशोक नेते यांनी आपल्या खासदारकीच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात अहेरी विधानसभा क्षेत्रात स्वतःची संघटन तयार करून न घेतल्याने त्यांना ईथे पूर्णतः महायुतीच्या नेत्यांवरच अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
तर
दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवारासाठी काँग्रेसचे समन्वयक
अजयभाऊ कंकडालवा
र यांच्या
नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने प्रचार कार्याला लागल्याचे चित्र विधानसभा क्षेत्रात पहायला मिळत आहे.गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कोणाचे पारडे जड
आहे याचे
अंदाज आजच लावणे थोडाफार अवघड असले तरी अहेरी मतदारसंघात मात्र काँग्रेसचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार व त्यांचे समर्थकांची प्रचारशैली हे मतदारांना
आकर्षित करत आहेत.
संपूर्ण विधानसभा क्षेत्रात ककडालवार
व
त्यांचे समर्थक
आणि मित्र पक्षांनी मोदी
व
नेतेंविरुद्ध सुरू ठेवलेल्या यशस्वी प्रचाराकडे मतदारांनी जर आपले कल वळविल्यास
महायुतीचे उमेदवार अशोक
नेतेंची
हॅट्रीकाला
अहेरी विधानसभेतूनच
ब्रेक
लागणार तर नाही ना ? या चर्चेला सर्वत्र उधाण आली आहे.