गडचिरोली जिल्हा

निरपराध नागरिकांची जीव घेणाऱ्या ‘त्या’ रानटी हत्तीची तात्काळ बंदोबस्त करा..! अन्यथा रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारू….!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी…

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सिरोंचा,आलापल्ली नंतर आता भामरागड वनविभागात रानटी हत्तीने एन्ट्री केली असून या हत्तीने धुमाकूळ माजवत निरपराध नागरिकांची बळी घेत आहे.त्यामुळे या  परिसरात रानटी हत्तीची दहशत निर्माण झाली आहे.यापुढे कोणतीही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून  वनविभागाने रानटी हत्तीची तात्काळ बंदोबस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरून वनविभागाच्या कार्यालयासमोर जनआंदोलन उभारण्याची इशारा काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र समन्वयक  व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी दिली आहे.

२३ एप्रिल ला रात्रोच्या सुमारास रानटी हत्तीने चिरेपल्ली (कोत्तागुडम) येथील परशुराम सोयाम यांच्या घराचे नुकसान करत ताडगूडा गावात धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पेरमिली वनपरिक्षेत्रातील आरेंदा मार्गे कोरेली गावात रात्रीच्या सुमारास त्या रानटी हत्तीने शेतातील घराचे नुकसान केले. २५ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील आज कियर गावात एका एसमाची हत्या केली त्या इसमाची नाव गोगुलू तेलामी गावालगतच्या जंगलात त्या रानटी हत्तीचा मुक्तसंचार सुरू असून याही परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावा लगत २०० मीटर अंतरावर रानटी हत्ती असूनही वन विभागाचे अधिकारी पोहोचले नसल्याचे गावकरी सांगत आहेत. गावाच्या अगदी नजीक रानटी हत्ती आला असल्याने येथील नागरिक भयभीत झाले असून कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी वनविभागाने दखल घेत या रानटी हत्तीची तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा जणआंदोलन उभारण्याची इशारा काँग्रेसचे युवा नेते व  जि. प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close