गडचिरोलीत नेमकं कोण उधळणार विजयाचा गुलाल….!

रवी सल्लम ….विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा…
गडचिरोली – चिमूर (अनु.जमाती) या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यातच पार पडली आहे.अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या या मतदारसंघात मतदान अगदी शांततेत पार पडला.लोकसभा क्षेत्रात मतदान शांततेत पार पडल्याने सर्वच पक्षाचे उमेदवार,पदाधिकारी व कार्यकर्त्यानी निवडणुकीच्या या धावपळीतून मुक्त झाले असून विजयाचे गणित बांधतांना सर्वपक्षीय उमेदवार,पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडल्याचे सगळीकडे दिसून येत आहे.असे असले तरी येत्या 4 जूनला गडचिरोलीत नेमकं विजयाचा गुलाल मात्र कोण उधळणार..! आता याकडे लोकसभा क्षेत्रातील सगळ्यांचे लक्ष वेधून आहेत.
केंद्र सरकारच्या बिमारु जिल्ह्यांमध्ये गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघाचं समावेश आजही कायम आहेत.या मतदारसंघाचे मागील दहा वर्षांपासून भाजपचे अशोक नेते हे खासदार आहेत.आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात खासदार नेतेनी जिल्ह्याची ‘बिमारु’ हे शब्द पुसण्याचे प्रामाणिक प्रयत्न त्यांच्याकडून झाल्याचे दिसून आले नाहीत.? तब्बल दहा वर्षे सत्ताधारी पक्षाचे खासदार राहून सुद्धा आपल्या लोकसभा मतदार संघात एकही महत्वपूर्ण विकासकाम घडवून न आणल्याची नाराजी मतदारांमध्ये निवडणुकीदरम्यान पाहायला मिळाली.तरीही भाजपने तिसऱ्यांदा सुद्धा या लोकभेसाठी अशोक नेते यांनाच आपली पसंती दर्शवित उमेदवारी जाहीर केली तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने डॉ.नामदेव किरसान या नवखे उमेदवाराला पहिल्यांदाच तिकीट दिली.या लोकसभा क्षेत्रात एकुण दहा उमेदवार आपले भाग्य अजमवित असले तरी मुख्य लढत मात्र महायुतीचे उमेदवार अशोक नेते व महाविकास आघाडीचे डॉ.किरसान यांच्यातच पाहायला मिळाली.
गडचिरोली – चिमूर या लोकसभा क्षेत्राची मतदान आटपल्यानंतर मविआचे उमेदवार डॉ.किरसान हे लोकसभा क्षेत्रातील आपल्या कार्यकर्त्यांच्या दरबारात जाऊन भेटी-गाठी घेत आपापल्या मतदान केंद्रावरील मतदानाची सविस्तर माहिती घेत आहे तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार खा.नेते यांनी मात्र आस्थेचे ठिकाण असलेल्या शिर्डीचे दरबारी जाऊन श्रीसाई चरणी माथा टेकून विजयाची मन्नत मागत असल्याचे त्यांचे सामाजिक माध्यमांवर प्रसारित पोस्ट वरून दिसून येत आहे.
एकुण सहा विधानसभा मतदारसंघाच समावेश असलेल्या या लोकसभा मतदारसंघात मोदी लाटेत सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले अशोक नेतें हे यंदा हॅट्रीकासाठी संधीसाठी पाहत आहे तर मविआचे नवखे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान हे मात्र सत्ता विरोधी लाटेत आपणच निवडून येऊ ?असा दावा करतांना दिसून येत आहे.मविआचे नवखे उमेदवार डॉ.किरसान व संसदीय क्षेत्राचे दहा वर्षाचे दांडगा अनुभव असलेल्या खा.अशोक नेते या दोघांमध्येच थेट ‘टाईट अँड फाईट’ ची लढाई झाल्याने गडचिरोलीत नेमकं गुलाल कोण उधळणार हे मात्र येत्या 4 जुनलाच रितसर कळणार आहे.