महाराष्ट्र सरकारने सिरोंचा तालुक्याला तेलंगणा राज्यात समाविष्ट करावं…!राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर मूलकला यांची मागणी..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….प्रतिनिधी….
सिरोंचा…..गडचिरोली
जिल्ह्या
तील सिरोंचा
तालुका हा अतीदुर्गम
व नक्षलग्रस्त तालुका म्हणून
सर्वत्र ओळख
ल्या जातात. अश्या या सिरोंचा
तालुक्यात
तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी, मुख्याधिकारी सह अनेक अधिकाऱ्यांची पदासह कर्मचाऱ्यांची सुद्धा अनेक महिन्यांपासून पदे रिक्त असल्याने याची विपरीत परिणाम तालुक्याचा विकासकामांवर होत आहे.यामुळे या तालुक्याची विकास खुंटलेला आहे.या तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून नानाविध समस्या प्रलंबित असून या समस्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सरकरांकडून होतांना दिसून येत नाही आहे.
सिरोंचा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आजसुद्धा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.सार्वजनिक आरोग्य,शिक्षण ,सिंचन व रोजगार याकडे सरकारची व जिल्हा प्रशासनाची अक्षम्य दुर्लक्ष होत असून परिणामी या तालुक्यातील जनतेला प्रत्येक कामांसाठी शेजारी तेलंगणाला धाव घ्यावं लागतं आहे.सिरोंचा तालुक्याला सरकार व जिल्हा प्रशासन वाऱ्यावर सोडल्याचं मागील अनेक वर्षांपासून असे चित्र निर्माण होत असल्याने या तालुक्यातील जनतेत सरकार व जिल्हा प्रशासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त होतांना दिसून येत आहे.मागील अनेक वर्षांपासून या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची रोटी-बेटी व्यवहारासह संपूर्ण जीवन प्रक्रियाच तेलंगणावर अवलंबून असल्याने सिरोंचा तालुक्याला शेजारी राज्य असलेल्या तेलंगणात राज्यात समाविष्ट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी केली आहे.
आजच्या घडीला सिरोंचा येथील तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी व नगरपंचायतचे मुख्य अधिकारी सह अनेक विभागाचे कर्मचाऱ्यांची पदे असे शहरी व ग्रामीण भागात विकासात्मक योजना राबविणाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे या तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रासाला नेहमी सामोरे जावे लागत आहे.एकंदरीतच सरकार व जिल्हाप्रशासनाने सिरोंचा तालुक्याला प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती सोपवून या अविकसित तालुक्याप्रती सापत्न वागणूक करीत असल्याचे जाणवत असल्याने राज्य सरकारने एका क्षणाचाही विलंब न करता तेलगू भाषिकांची तालुका म्हणून ओळख असलेल्या सिरोंचा तालुक्याला तेलंगणा राज्यात समाविष्ट करण्याची सागर मूलकाला यांची मागणी आहे.