तलवाडा येथे सल्ला गांगरा शक्ती स्मारकाचे लोकार्पण व भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरा

पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते लोकांर्पण..
## तलवाडा येते सल्ला गांगरा स्मारकाचे लोकार्पण व भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरा..!!
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क….
पेरमिली:- तलवाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधून सल्ला गांगरा स्मारकाची शाही थाटात पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.
सर्व प्रथम आदिवासी सांस्कृतिक व परम्परेनुसार सम्पूर्ण गांवात मिरवणूक काढून श्री.भास्कर तलांडे, यांच्या शुभ हस्ते सल्ला गांगरा स्मारकाची शाही थाटात लोकार्पण करण्यात आले.तसेच यांच्या दिवशी आदिवासी समाजक्रांतीचे जनक भगवान बिरसा मूंडा यांच्या जयंती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या उदघाटनीय स्थानावरून बोलताना पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे मानले ब्रिटीशाविरुद्ध स्वतंत्र लडयात बिरसा मुंडा यांची महत्वपूर्ण भूमिका होती.आदिवासी समाजात जल,जंगल,जमीनीसाठी तसेच आदिवासिंचा हक्क,स्त्री स्वातंत्र्य,मानवी प्रतिस्ठा यासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी लडा दिले आहे त्याच्या कार्य डोळ्यासमोर ठेवून समाज बांधवानी कार्य करावी अशी मत व्यक्त केली.
तसेच अन्य मान्यवर श्री.कालीदास कुसनाके,श्री.बांगरू गावडे सर,श्री.शंकर गावडे सर व अन्य मान्यवरानी भगवान बिरसा मुंडा,यांच्या ऐतिहासिक कार्यावर व जीवनावर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मेडपली ग्राम पंचायतचे सरपंच श्री.निलेश वेलादी होते.तर प्रमुख वक्ते म्हणून श्री.कालीदास कुसनाके,गावडे सर,सामाजिक कार्यकर्ते श्री.सीताराम मडावी,होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून नुकतेच यू.पी.एस.सी.उतिर्ण झालेले विलास गावडे,यांच्या स्वागत सत्कार करण्यात आले.
यावेळी मंचावर पेसा समन्वयक श्री.संजय कोठारी, किशोर सड़मेक,आदि होते.
कार्यक्रमाच्या संचालन व आभार प्रदर्शन श्री.सूरज मडावी यांनी केली तर यावेळी सुरेश पोद्दाडी,देवाजी पोद्दाडी,निरंजना गावडे,व गावातील युवक युवती व नागरिकांनी सहकार्य केले.