ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुगांना जेवण नित्कृष्ट दर्जाचे .
- विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी…
अहेरी: उपविभागातील अहेरी, भामरागड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.रुग्णांना देण्यात येणारे जेवण अर्धवट शिजलेले तर पोळ्याही चावणे कठीण असल्याच्या रुग्णांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागले आहेत.या प्रकारच्या जेवणामुळे बरा होणारा रुग्णही आणखी आजारी पडण्याची शक्यता आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयांवार गंभीर्याने लक्ष देत नसल्याने येथील रुग्णांची हल्ल बेहाल होतांना दिसून येत आहे.
तालुक्यातील रुग्ण बरे होण्यासाठी या ठिकाणी येत असून बरे होण्याची आशा रुग्ण बाळगतात.मात्र येथे दाखल झाल्यानंतर विशेष म्हणजे येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
जेवणातील डाळ अर्धवट शिजलेली भातासाठी वापरलेला तांदुळही निकृष्ट आणि पोळ्या चावणेही कठीण असल्याने रुग्ण बरा होण्या ऐवजी आणखी आजारी पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे याबाबत तक्रार प्राप्त झाली असल्याने.
कंकडालवार यांनी या रुग्णालयात अशाप्रकारे नित्कृष्ट दर्जाचे जेवण मिळत असेल रुग्णालयात बरे होण्यासाठी आलेले रुग्ण पुन्हा बिमार पडतात त्या करीता अशाप्रकारेचे नित्कृष्ट दर्जाचे जेवण देण्याऱ्या कंत्राटदारावर कारवाई करुन त्या कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी कंकडालवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.