Uncategorized

जि.प माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून आरेंदा येथील आत्राम कुटुंबाला आर्थिक मदत…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी…

अहेरी : तालुक्यातील आरेदा येथील मादी रामा आत्राम काही कामानिमित्य आल्लापल्ली येथे येऊन आपले कामे आटोपून परत आपल्या गावाकडे जात असताना आल्लापल्ली ते तलवाडा या रस्त्याचे खडीकरणाचे कामे चालू असून संततधार पावसामुळे रस्त्यावर चिखल माखले असल्याने दुचाकीची तोल गेल्यामुळे दुचाकी वाहन खाली कोसळल्याने  यात मादी रामा आत्राम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.पुढील उपचारासाठी त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.रुग्णालयात त्यांचे पायाची एक्सरे काढण्यात आली.येथील डॉक्टरांनी त्यांचे एक्सरे रिपोर्ट पाहिल्यावर यात त्यांची मोडल्याचे सांगितले.तसेच उपचारासाठी खाजगी दवाखाना किंवा गडचिरोली ,चंद्रपूर ला जाणे आवश्यक असल्याचे सांगितले.मादी रामा आत्राम यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने पुढील उपचारासाठी पैसे कुठून आणायचं,अस प्रश्न त्यांना पडला होता.

परंतु येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी मादी रामा आत्राम यांची परिस्थिती काँग्रेसचे नेते व  जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना सांगितले असता कंकडालवार यांनी दुखापतग्रस्त आत्राम कुटुंबाला आपल्या जनसंपर्क कार्यालयात बोलावून घेऊन त्यांना उपचारासाठी आर्थिक मदत दिली.

              यापुढेही सुध्दा मी आपल्या कोणत्याही कामासाठी आणि मदतीसाठी स­दैव तयार असल्याचे सांगत कांकडलवार यांनी आत्राम  कुटुंबियांना मोठा धीर दिला.

आर्थिक मदत करतांना प्रशांत गोडसेलवार नगरसेवक मादी रामा यांची पत्नी,साईनाथ आत्राम,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,कुमार गुरनुले,सचिन पंचार्य,प्रकाश दुर्गे उपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close