अहेरी विधानसभा क्षेत्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसह घरांची पडझड झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी…!
काँग्रेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी...!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….प्रतिनिधी….
गडचिरोली…सलग दहा ते पंधरा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीची फटका अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांना बसली असून यात शेतकऱ्यांची उभी पिकांसह अनेक नागरिकांचे राहत्या घरांचे पडझड झालेली आहे.यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेतातील पिकांचे आणि घरांचे पडझड झालेल्या गरीब नागरिकांचे तात्काळ मोका पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांनी केली आहे.
अहेरी विधानसभेत झालेल्या अतिवृष्टीमुळे सिरोंचा,अहेरी,भामरागड,मुलचेरा आणि एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाली असून अनेक गरीब लोकांचे घरही कोसळल्याने बेघर झाले आहेत.या अतिवृष्टीुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील उभी पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवली आहे.
अतिवष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शासन व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसानीचे मोका पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह बेघर झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.