अहेरी तालुकासामाजिक

कंकडालवारांची जनसंपर्क कार्यालय वंचितांसाठी आधारवड ठरू लागलंय काय…?

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …..प्रतिनिधी….

गडचिरोली : यापूर्वी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनेकांनी महानुभवांनी भूषविले होते. हे जगजाहीर असेल तरी त्याच्यातून एकाने तरी आपल्या स्वतःच्या एखादं जनसंपर्क कार्यालय उघडून वंचितांची सेवा करण्याचे धाडस कोणी केले नाही अन् आजच्या घडीला तसे दाखले सुध्दा नाहीत.

जिल्ह्यातील यापूर्वीचे काही आजी- माजी लोकप्रतिनिधींनी एकदा सत्तेतून बाद झाले की,मग जनतेशी थेट जनसंपर्क करणेच सोडून द्यायचं आणि परत एखादं निवडणुक जवळ आले कि, मग परत जनतेशी जनसंपर्क ठेवण्याचं प्रयत्न करीत असतात.आपल्या हाती सत्ता असले की मग जनतेशी संपर्क ठेवायचं अन् सत्ता नसले कि मग सर्वसामान्य जनतेशी साधा ओळखी सुध्दा नाही ठेवायचं..? असे चित्र आजपर्यंत आजी -माजी लोकप्रतनिधींप्रती जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळालेला आहे.

मात्र याउलट गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या जि.प.अध्यक्ष पदाचे कार्यकाळ संपल्यानंतर अहेरी येथील आपल्या निवासस्थानी एखादं कॅबिनेट मंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला शोभेलअसे भव्य दिव्य जनसंपर्क कार्यालय उघडून या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील शहरी भागांसह दुर्गम भागातील अनेक खेड्यांतील गरीब व गरजूंवतांना मदतीचे हात दैंनदिन प्रामाणिकपणे निरंतर सेवाकार्य सुरू ठेवल्याने सदरहू जनसंपर्क कार्यालय विधानसभा क्षेत्रातील वंचितांसाठी एकप्रकारचे *आधरवडच* ठरू लागलंय…!

तसे अहेरी शहर हे विधानसभा क्षेत्राचे मध्यवर्ती ठिकाण आहेत.त्या पाठोपाठ राजनगरीसह राजकीय नगरी सुध्दा आहेत.जिल्ह्याचं राजकीय घडामोडीत या नगरीची नेहमी धबधबा असतात.अहेरी नगरीला पाच ते सहा दशकांची राजकीय इतिहास सुध्दा आहेत.राजनगरी व राजकीय नगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी शहरात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आपल्या निवासस्थानासमोर स्वतःची भव्य दिव्य असे जनसंपर्क कार्यालय थाटून मागील दशकभरा पासून सर्वसामान्य जनतेसह वंचितांची पिढा उचलण्याचे निस्वार्थ सामाजिक कार्याला कायम सुरू ठेवले आहे.अजय कंकडालवार यांनी मुख्यतः आपल्या जनसंपर्क कार्यालयातून सामाजिक कार्यासह विविध समाजामध्ये जनजागृती करणे,शेवटच्या घटकातील लोकांमध्ये विश्वासाहर्ता निर्माण करणे आणि नातेसंबंध टीकवून ठेवण्याचं काम सुध्दा करीत आहेत.

*सर्वधर्मियांच्या सत्कार्यासाठी त्यांचे मदतीचे दार खुलेच*

अहेरीचे समाजसेवी अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयातून एकीकडे वंचितांचे पिढा कार्याला सुरुवात ठेवतच क्षेत्रातील सर्व धर्मीय सत्कार्याला आपल्या परीने मदत करीत असतात.मंदिराचे बांधकामापासून तर सगळ्याच समाजाला त्यांच्या आस्थेचं ठिकाणंच्या बांधकामासाठी आपल्यापरिने सहाय्य करीत असतात.त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मदतीसाठी गेलेल्यांची त्यांनी कधीही निराशा केल्याचं उदा. नाहीत.म्हणूनच अहेरी विधानसभा क्षेत्रातील गरीब,गरजूवंत आणि पिढीत लोक मोठ्या हिंमतीने कंकडालवारांच्या जनसंपर्क कार्यालयात मदतीसाठी जात असतात.हे विशेष…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close