अहेरी तालुका

येत्या दहा दिवसांत दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर पर्यायी वळन निर्माण करण्याचे कंकडालवारांना सहाय्यक अभियंताकडून लेखी आश्वासन…!

आता दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर एस.टी बसेस सुध्दा धावणार आहे..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….प्रतिनिधी…

अहेरी : आल्लापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड या दोन राष्ट्रीय महामार्गाची जणूकाही चाळणच झाली आहे. दोन्ही राष्ट्रीय महामार्ग खड्यानी माखलेले आहेत.संबंधित कंत्राटदारांनी भर पावसाळ्यात या दोन्ही महामार्गावर पुलांचे बांधकाम सुरू केले.पुलांचे बांधकामांजवळ पर्यायी वळण मार्ग तयार न केल्याने आवगमान बंद पडले होते.अनेक गावांच्या संपर्क तुटलेला होता.या रस्त्यावरील वाहतूक ही टप्प होता. सदरहू गंभीर समस्याची काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करून निवेदन देऊन सदर रस्ता सुरळीत सुरू करण्याची मागणी केली होती.

जर पर्यायी वळण मार्गांची निर्मिती न केल्यास चक्काजाम आंदोलन करण्याची इशारा देखील सुध्दा त्यांनी निवेदनातून  केली होती.कंकडालवारांच्या निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाचे सहाय्यक अभियंत्यांनी आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर दहा दिवसांत पर्यायी वळण मार्गाचे कामाला प्रारंभ करण्याचे लेखी आश्वासन दिले.

तसेच यापूर्वी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी एसटी महामंडळाचे अधिकाऱ्यांसोबत दोन्ही मार्गावरील बंद पडलेल्या बसेस बाबत चर्चा केले होते.या चर्चे दरम्यान कंकडालवार यांनी दोन्ही मार्गावर आवश्यक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करुन एसटी बसेसची वाहतूक पुर्ववत करण्याची मागणी केले होते.या मागणीची दखल घेत सहायक अभियंता श्रेणी २ रा.म. उपविभाग आलापल्ली व सहायक अभियंता श्रे-2 रा.म.उपविभाग धानोरा यांनी दोन्ही मार्गावर बसेसची नियमित वाहतूक करण्याचे लेखी पत्राद्वारे कांकडालवार यांना कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close