गडचिरोली जिल्हाधार्मिक कार्य

शिर्डी येथील साई दरबारात अजयभाऊ कंकडालवार झाले नतमस्तक…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….प्रतिनिधी..

गडचिरोली : माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त मुंबई येथे होणाऱ्या काँग्रेस पक्षाचे आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातील  काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईला काल रवाना झाले.

मुंबईला जात असतांना काल रात्रोला शिर्डी येथे मुक्काम केले. आज सकाळी कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत शिर्डी येथील साईमंदिरात जाऊन साई चरणी नतमस्तक होऊन विधिवत पूजा अर्चना करून साईरामचे दर्शन घेतले.त्यांनी साईचरणी नतमस्तक होऊन गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती,समृध्दी ,समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.

यावेळी जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे समस्त तालुका अध्यक्ष आजी – माजी जिल्हा परिषद सदस्य – पंचायत समिती सभापती उपसभापती,नगरपंचायतचे नगराध्यक्षा,नगरसेवक – आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य गण व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close