Gamesमूलचेरा तालुका

श्रीनगर येथील फुटबॉल सामन्याचे अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन…!

सामन्याचे सहउदघाटक म्हणून काँग्रेस नेते हनमंतू मडावी यांची उपस्थिती..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….प्रतिनिधी…

मुलचेरा : तालुक्यातील श्रीनगर येथील आदर्श स्पोर्टिंग फुटबॉल क्लब श्रीनगर द्वारा भव्य फुटबॉल स्पर्धेची आयोजन करण्यात आलं होता.या स्पर्धेसाठी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक  तर तृतीय पारितोषिक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्याकडून ठेवण्यात आले.

या फुटबॉल स्पर्धेची उदघाटन काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालं तर सामन्याचे सहउदघाटन म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी उपस्थित होते.

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेस नेते हनमंतू यांची गावात आगमान  होताच  गावकऱ्यांनी विविध नूत्य करत ढोल ताशांच्या निनादात जंगी स्वागत केले. स्वागता नंतर कंकडालवार व मडावी यांनी माता सरस्वती ,सुभाषचंद्र भोस आणि  स्वामी विवेकानंद यांच्या  फोटोंना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.

फुटबॉल सामन्याचे उद्घाटन प्रसंगी कांकडलवार आणि  मडावी यांनी समयोचीत मार्गदर्शन केले.तर मलेश सरकार,वेडेटीवार,समीर रॉय,त्रिशा नैताम,सुकमार दारू,रॅबिन मिस्त्री,मुन्ना नैताम,निरापद विश्वास,जगन्नाथ मजूमदार,अविनाश दारु,रॉबिन दारू,दिनबंधू पाल,असीम सरकार,दुलाल मंडल,सचिन,शंकर कुटीर,शंकर सरकार,शिवपद बुधक,शंकर बनिक,कार्तिक तोगम,स्वप्नील मडावी,आकाश देवाण,साधन बनिक,प्रदीप,सचिन पंचार्यसह स्थानिक परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि फुटबॉलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close