अहेरी तालुकाधार्मिक कार्य

देवलमरी येथील पुरातन शिवमंदिरात काँग्रेस नेते कंकडालवार व मडावी यांची पूजा-अर्चना संपन्न..!

शिवमंदिरात श्रावणमास निमित्त नित्य पूजा कार्यक्रम थाटात

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क….प्रतिनिधी..

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील पुरातन शिव मंदिरात  दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा श्रावणमास निमित्त दोन दिवसीय भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वर्षी सुद्धा सलग दोन दिवस भजन कार्यक्रम भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झालं आहे.तसेच शिव मंदिरात या दोन दिवस भाविकांना महाप्रसादाची वितरण ही  करण्यात आली होती.

काल भजन कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने  काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी येथील शिव मंदिरात भजन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून भगवान शिवशंकराची विधिवत पूजा अर्चना करून दर्शन घेतले.तसेच कंकडालवार व मडावी यांनी मंदिरात आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाला आर्थिक मदत सुध्दा केले.

यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी भगवान शिवजींच्या चरणी माथा ठेकुन गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली तसेच उपस्थित गावकऱ्यांकडून येथील स्थानिक समस्या जाणून घेतले.

शिव मंदिरात दर्शनाच्या वेळी काँग्रेस नेत्यांच्या समवेत  नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,देवलमरी काँग्रेसचे पदाधिकारी महेश लेकूर,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्यसह स्थानिक कार्यकर्ते तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close