अहेरी तालुकाधार्मिक कार्य

दहीहंडीचे थर पाहण्यासाठी आल्लापल्ली येथे उसळली नागरिकांची तुंबळ गर्दी…!

काँग्रेस नेते कंकडालवार यांच्या हस्ते दहीहंडी कार्यक्रमाचे उद्घाटन..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी..

अहेरी :आल्लापल्ली येथे  दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने  मंगळवारला प्रेन्डस क्रिडा व सांस्कृतीक मंडळातर्फे दहीहंडीचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.आल्लापल्ली येथील दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात अनेक गोविंदा पथकांनी सहभागी होऊन  दहीहंडी फोडली.

स्थानिक वीर बाबुराव चौकात  कान्हा मटकीफोड कार्यक्रमाची काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन पार पडली.तसेच प्रथम क्रमांक पटकविलेल्या गोविंदा पथकाला काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक म्हणून 55555/- रु देण्यात आले.

दहीहंडी कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित भाविक तसेच नागरिकांसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या कडून महाप्रसाद कार्यक्रमही ठेवण्यात आली होती.या महाप्रसादाचे शेकडो भाविकांनी आस्वाद घेतला.दहीहंडीचे थर पाहण्यासाठी आलापल्लीसह परिसरातील नागरिकांची तुंबळ गर्दी होती. यावेळी  अजयभाऊ कंकडालवार आणि मडावी यांनी समस्त जनतेला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शुभेच्छाही दिले.

या दहीहंडी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी होते.विशेष अतिथी म्हणून आलापल्ली ग्रामपंचायतचे सरपंच शंकर मेश्राम – नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे – उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे – पोलीस निरीक्षक अहेरी दशरथ वाघमोडे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली अजय कंकडालवार – नागेपल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सरोज किशोर दुर्गे – व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंचावर मंदाताई कंकडालवार,अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,माजी सभापती गीता चालूरकार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,राजक पठाण, अज्जू पठाण,किशोर दुर्गे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,ग्रामपंचायत सदस्य शारदा कडते,ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख,तंटामुक्ती अध्यक्ष दीपक तोगरवार,स्वप्नील मडावी,परमेश्वर आत्राम,भाग्यश्री बेझलवार,आनंद दहागावकर,मिलिंद खोंड,नरेश गर्गम,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवार,कोरेत ताई,गागोरी काका,किशोर सडमेक,चंद्रकांत बेझलवार,इमरान खानसह परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close