सामाजिकसिरोंचा तालुका
नागपूर येथे आपदा मित्र म्हणून किरण वेमुला यांचा विशेष पुरस्काराने सत्कार..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….प्रतिनिधी… सिरोंचा
सिरोंचा तालुक्यातील सेवाभावी व सामाजिक कार्यकर्ते किरण वेमूला यांचा आपदा मित्र म्हणून विशेष पुरस्काराने नागपूर येथे विभागीय आयुक्तांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
नागपूर येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन व मदत ,पुनर्वसन विभागामार्फत प्रशासनंतर्गत नैसर्गिक आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते किरण वेमुला यांचा आपदा मित्र म्हणून मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या सन्मानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते किरण वेमुला यांचा सर्वस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.