अहेरी तालुकाधार्मिक कार्य

आल्लापल्ली येथील नवयुवक आदिवासी भजन मंडळाला भजन साहित्य खरेदीसाठी कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..प्रतिनिधी….

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील नवयुवक आदिवासी भजन मंडळाचे कलावंतांना भजन साहित्य खरेदी साठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्यापरीने आर्थिक मदत दिली.

 आल्लापल्ली येथे गणेश उत्सव आणि दुर्गा नवरात्री उत्सव मोठ्या थाटात पार पडतात.दरम्यान विविध मंडळाकडून भजन कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात.आल्लापल्ली  येथील नवयुवक आदिवासी भजन मंडळाकडे आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याने त्यांना भजन कार्यक्रमावेळी अडचण भासत होती.

म्हणून आज नवयुवक आदिवासी भजन मंडळाचे कलावंतांनी  माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची त्यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन त्यांना भजन साहित्य खरेदीसाठी होत असलेली आर्थिक अडचण सांगितले असता यावेळी कंकडालवार यांनी क्षणाचाही विलंब न करता भजन मंडळाना साहित्य खरेदी करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत केली.यामदतीप्रती आलापल्ली येथील नवयुवक भजन मंडळाचे कलावंतांनी  अजय कंकडालवार यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले.

आर्थिक मदती दरम्यान मंडळाचे मनोज सडमेक,योगेश कोतावर,ऋषी नैताम,चिंना मुरमुरवार,गणेश मोहूर्ले,जेयेश केपाले,प्रथम नागापुरे,छोटू नागापुरे,प्रणु हुईके,अनिकेत कंनाके,सोहल आलाम,राहुल कोटरंगे,गजानन सडमेक,गणेश माणेपल्ली,विनीत मडावी,साई उईके,अनुराग पासपुनुरवार,अय्यप्पा भक्त गण सुरेश गुरुस्वामी पद्मागिरीवार,रवी भोयर,माधव गिलासपल्ली,मनोज गागापूरवार,अरुण सराफवार, मनोज बिट्टीवार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close