अहेरी तालुकाधार्मिक कार्य

श्रीगणरायाची महाआरती कार्यक्रमाला कंकडालवार यांनी दर्शविली उपस्थिती…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….प्रतिनिधी…

अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागातील अहेरी तालुक्यात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतात.यावर्षी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत अहेरी तालुक्यात सगळीकडे बाप्पाचा प्रतिष्ठापणा मोठा उत्साहात पार पडला.यात विशेष म्हणजे अहेरी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 येथील ढीवर मोहल्यात या वर्षी सुद्धा मोठ्या उत्सहात श्रीगणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.

काल गणेश मंडळाजवळ श्रीगणरायाची महाआरती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महाआरती कार्यक्रमाला गणेश मंडळाचे निमंत्रणावरून काँग्रेसचे नेते व अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी कार्यकर्त्यांसमवेत उपस्थित राहून बाप्पाचे विधिवत पूजा अर्चना करून गणरायाला आरती दिले.तसेच यावेळी गणेश मंडळाला आपल्या परीने वर्गणी देण्यात आली .

यावेळी स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार ,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,उमेश बोरेवार,राहुल बाकेवार,प्रशांत पडगेलवार,वेणुगोपाल मंचारलावार, अधर्ष रमगुंडावार,प्रेया मगडीवार,साक्षी बाकेवार,रोज्या बाकेवार,वाचला बोरेवार,दीपा बोरेवार,रवी बोरेवार,अरुण मंचरलावार, प्रेयां गुंमलवार, रोहीत पडगेलवार,राहुल पडगेलवार,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह मंडळाचे पदाधिकारी सदस्य तसेच वॉर्डातील समस्त नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close