सिरोंचा येथे तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयाचे खा.डॉ.नामदेवराव किरसान यांच्या हस्ते उद्घाटन…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….प्रतिनिधी…
सिरोंचा : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांच्या हस्ते नुकताच सिरोंचा येथे तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उद्घाटन उरकला. क्षेत्राचे खासदार डॉ. कीरसान हे सलग तीन दिवस तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुका काँग्रेस कॅमिटीचे अध्यक्ष सतीश जवाजी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होता.
तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाचे उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे आणि माजी जि.प.अध्यक्ष तथा काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार, माजी आमदार पेंटा रामाजी तलांडी,काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यालयाचे उद्घाटक म्हणून बोलतांना क्षेत्राचे खासदार डॉ.किरसान यांनी सदरहू कार्यालय हे या तालुक्यातील शेवटचा घटकाचे निस्वार्थ पनाचे सेवा कार्याचे प्रतिबिंब बनावे,या कार्यालयातून शोषित वंचितांचे पिढा उचलण्याचे एक केंद्र बनावं असे म्हंटले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जवाजी यांच्या या कार्यावर समाधान व्यक्त केले.