आल्लापल्ली येथील लाडका गणेश मंडळाला कंकडालवार दांपत्यानी दिली भेट..!
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …प्रतिनिधी..
अहेरी : आलापल्ली येथील आलापल्ली लाडका राजा गणेश मंडळाला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार तसेच आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी भेट देऊन श्री गणरायाची दर्शन घेतले.
माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार व हणमंतू मडावी यांनी श्रीबाप्पाची विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन दर्शन घेतले.यावेळी त्यांनी श्रीबाप्पाची चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.तसेच मंडळाजवळ कंकडालवार परिवाराकडून महाप्रसाद कार्यक्रमाही आयोजन करण्यात आली आहे.स्थानिक नागरिक व भाविक महाप्रसाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून आस्वाद घेतले.
यावेळी अज्जू पठाण,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अनिल इसकापे,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवार,रिंकूभाऊ,चिंटूभाऊ,रज्जाक पठाण,नरेश गर्गम,विनोद रामटेकेसह परिसरातील नागरिक कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.