सिरोंचा तालुका

काँग्रेस पक्षाकडून आयोजित वॉर्ड चलो…पंचायत चलो अभियानाची यशस्वी सांगता..!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …प्रतिनिधी…

 सिरोंचा तालुका काँग्रेस पक्षाकडून आयोजित ‘वार्ड चलो पंचायत चलो’ अभियानाची नुकताच यशस्वी सांगता करण्यात आली.

          गडचिरोली जिल्हा युवा कांग्रेस प्रभारी श्री.पुशपेंद्र शाहू (बिलासपूर cg) हे तालुका दौऱ्यावर आले होते.युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी शाहू यांच्या प्रमुख उपस्थितीत सिरोंचा तालुक्यातील नडीकुडा,मुकीडीगुट्टा, टेकडा, आसरल्लीसह दुर्गम अतिदुर्गम गावांना भेटी देऊन कांग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाचे विचार धारेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
कांग्रेस पक्षाचे विचार तसेच पुढील प्रचार कार्यक्रमा बाबत विविध माहिती दिले व येत्या विधानसभा निवडणूकीच्या तयारी बाबत आढावा सुद्धा घेण्यात आले.
त्यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी शाहू यांचे सोबत तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष सतीश जवाजी, कांग्रेस जेष्ठ नेते एम.ए.अली, अनुसूचित सेल अध्यक्ष सारया सोनारी, रमेश तैनेनी आसरल्ली सरपंच, रामचंद्र गोगुला उपासरपंच टेकडा मोटका, महेश तलांडे, रामबाबू सग्गेम,सागर कोठारी,कोंडागोर्ला, अशोक कावेरी, शशिकुमार कावेरसह आदी कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close