सिरोंचा तालुका

सिरोंचा येथे रा.कॉ.शरदचंद्र पक्षाचे बूथ प्रमुखांचे बैठक संपन्न…!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …प्रतिनिधी.. महाराष्ट्र राज्यातील पुढच्या नाव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहेरी विधानसभा क्षेत्राचे सिरोंचा तालुक्यातील असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बूथ प्रमुखांची बैठक पार पडला.

   सदर  बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा तालुका अध्यक्ष सागर भाऊ मूलकला यांनी आयोजित केले होते. या बैठकीत तालुक्यातील ६९ बूथ प्रमुखांना बूथ प्रशिक्षण देण्यात आली.

             बैठकीत  आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बूथ प्रमुखांनी आपापल्या बूथ केंद्रांमध्ये घरोघरी जाऊन  पक्षाचे विचारधारा, आणि पक्षांचे बोध चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस हा चिन्ह लोकांपर्यंत पोचाविण्याचे आव्हान  अध्यक्ष मूलकला यांनी केली आहे.

           या बैठकीला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर भाऊ मूलकला, उपाध्यक्ष – मनोज कुम्मरी, अल्पसंख्यक आघाडीचे शहर अध्यक्ष सलमान शेखसह तालुक्यातील बूथ प्रमुख  उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close