बोरी येथे पारंपरिक गंगा मातेची प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटात संपन्न…!
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क….प्रतिनिधी…
*अहेरी:- अहेरी तालुक्यातील बोरी येथे पारंपारिक व ऐतिहासिक रित्या गंगादेवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम (हल्गेकर) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.भोई समाजाच्या वतीने मागील 40 वर्षांपासून सदरील कार्यक्रम घेण्यात येत आहे.
तसेच यंदाही पारंपारिकरित्या भोई समाज बोरी येथे दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी गंगादेवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी श्रीनिवास विरगोनवार, महेश बाकीवार, रामा बद्दीवार, अशोक वासेकर, साईनाथ अलवलवार, पोच्या बाकीवार, भिमराव कपेलावार, गंगा कपेलावार, शंकर सुर्लावार, संजय येल्लावार, सुरेश बाकीवार, मल्ला मंचर्लावार, गव्वा कपेलावार, विनोद मंचर्लावार, सुरेश मंचर्लावार, व्यंकटेश बलसपेल्लीवार, सिनू कपेलावार, गंगा कपेलावार यांच्यासह नागरिकांची व भक्तगणांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती.
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्या भाग्यश्री आत्राम यांच्या उपस्थितीमध्ये गंगा मातेची प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटात संपन्न झाली.