सिरोंचा तालुका

सिरोंचा येथे सकल हिंदू समाजाकडून भव्य निषेध रॅली…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी….

सिरोंचा :- मागील अनेक दिवसांपासून बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यक असलेल्या हिंदू समाजावर तेथील बहुसंख्यक समाजाकडून जाणूनबुजून अन्याय व अत्याचार करण्यात येत आहे. मागील काही महिण्यापूर्वी बांग्लोदश मध्ये त्या देशाच्या व्यक्तीगत विषयांवर अराजकता झाली होती.

यामुळे बांग्लादेशचे तत्कालीन पंतप्रधाननां भारतामध्ये शरण घ्यावं लागला होता.भारताने त्यावेळी त्यांना बिनशर्त शरण दिल्या होत्या.त्यानंतर बांग्लादेशातील काही असामाजिक संघटनानी तेथील अल्पसंख्यक हिंदूवर धर्माच्या आधारे अत्याचार,घरांची जाळपोळ,मंदिरे तोडणे असे अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार करत आहेत.यावर आपल्या देशाकडून बांग्लादेशातील हिंदूवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात असामाजिक संघटनानावर कडक कार्यवाहीची मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.जगामध्ये सगळ्याच जातीधर्माच्या लोकांना राहण्याचे समान अधिकार आहेत.

परंतु बांग्लादेशात मात्र फक्त हिंदूनाच लक्ष केले जात आहे. सदरहू विषय निंदनीय असून या मुद्यावर बांग्लादेशचा सरकार सोबत बोलून तेथील अल्पसंख्यक हिंदू समाजावर होणारे हल्ले व अत्याचार तात्काळ मार्गी लावावी तसेच तेथील समाज कंटाकावर कारवाईची मागणी करत सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेसह विविध हिंदुत्व संघटनानी एकत्रित येऊन येथील तहसील कार्यालयावर भव्य निषेध रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आली.

सिरोंचा शहरातील अय्यपा मंदिरापासून निषेध रॅलीची सुरुवात करण्यात आली. शहराचे मुख्य मार्गक्रमण करीत भारत माता कि जय, वंदेमातरम, बटेंगे तो कटेंगे आदी नाऱ्यांचे निनादात येथील तहसील कार्यालयावर धडक दिली.

तदनंतर निषेध रॅलीचे सभेत रूपांतर झाले.या सभेत भाजप नेते दामोधर अरगेलवार यांनी बांगलादेश मधील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होतं असलेल्या अन्याय व अत्याचारावर अभ्यासपूर्वक प्रकाश टाकत सकल हिंदू समाजाला जागृत राहण्याचे आव्हान करीत त्यांनी बांगलादेश मधील घटनेचे तीव्र शब्दांमध्ये निषेध केले.सदरहू रॅलीचे नेतृत्व भाजपचे दामोधर अरगेलवार, विश्व् हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नरसिंगराव सिलव्हेरी, भाजपचे तालुका अध्यक्ष शंकर नरहरी यांनी केले.या रॅलीनिमित्त येथील व्यापाऱ्यांनी स्वतः होऊन बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन रॅलीत मोठ्या संख्यने सहभागी झाले होते .

यावेळी सकल हिंदू समाजाकडून येथील तहसीलदार मार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन पाठविण्यात आले.सकल हिंदू समाजाकडून आयोजित निषेध रॅलीला विविध हिंदुत्व संघटनानांचे कार्यकर्त्यांची  बहूसंख्येने उपस्थिती होती .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close