सुभाषनगर येथील मृतक रिजवान शेख कुटुंबियांची काँग्रेस नेते कंकडालवार व मडावी यांच्याकडून सांत्वनपर भेट व आर्थिक मदत…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..प्रतिनिधी..
अहेरी : तालुक्यातील सुभाषनगर येथील युवक रिजवान शेख यांनी बुधवारी सायंकाळी म्हणजे 11 तारीखेला काही कामानिमित्त दुचाकीने घराबाहेर निघाले होते.रिजवान शेख यांच्या दुचाकीला सुरजागडची लोह उतखनन करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने रिजवान हे जागीच ठार झाले होते.
ट्रकच्या अपघातात रिजवानच्या जीव गेल्याने शेख कुटुंबावार खूप मोठा संकट कोसळला होता .येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना घटनेची माहिती दिले होते.घटनेच्या वेळी कंकडालवार हे नागपूर दौऱ्यावर होते.नागपूर दौरा आटोपून अहेरीला परत आल्यानंतर आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनमंतु मडावी यांनी सुभाषनगर येथील मृतक शेख कुटुंबाला भेट देऊन आस्थेने सांत्वन केले.
काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी शेख कुटुंबाची अडचण बघून पुढील होणाऱ्या कार्यक्रमाला
आपल्यापरीने आर्थिक मदत केले आहे.दरम्यान कंकडालवार सांगितले की
, समोर कोणत्याही अडचण भासल्यास आपण सदैव आपल्या पाठीशी असल्याचे सांगत शेख कुटुंबाला मोठा धीर दिले. यावेळी माजी सरपंच अज्जू पठाण,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रशांत सरकटे,सय्यद सोनू,फिरोज कुरेशी,जाकीर शेख,फिरोज पठाण,संतोष तलांडे,गंगा नाईनवार,हसन भाईसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते.