वेलगूर येथील शितल माता मंदिराचे कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न….!
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…. प्रतिनिधी….
अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथे शीतल माता मंदिर नसल्यामुळे गावांतील प्रत्येक प्रवर्गातील समाज बांधवाना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचन भासत होती. एखाद्याच घराचं वैयक्तिक कार्यक्रम असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम असो तसेच सामाजिक कार्यक्रम असले सर्व प्रथम शितल मातेची पूजा अर्चना करूनच बाकीचे कार्यक्रम पार पाडव लागत असतात.परंतु वेलगूर येथे शितल मातेची मंदिर नसल्याने येथील नागरिकांना अडचण होतं होती.
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी वेलगूर येथे दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या दौऱ्यावेळी
येथील ग्रामस्थांनी त्यांच्याजवळ गावासाठी शितल माता मंदिर बांधकाम करून देण्याची मागणी केले होते. मंदिर बांधकामासाठी सरकारकडून निधी होऊ न शकल्याने कंकडालवार यांनी मात्र वेलगूर वासियांची मागणीची मान राखत त्यांनी आपल्या स्व
:खर्चाने
शितल माता मंदिर बांधून
देण्याची ग्वाही दिले
होते. त्यांनी दिलेल्या ग्वाही नुसार वेलगूर येथे स्वखर्चाने मंदिर बांधका
माला सुरुवात केले होते.
नुकताच मंदिराचे बांधकाम पूर्णतःवास आल्याने या मंदिराचे लोकार्पण आदिवासी विध्यार्थी संघ,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते
विधिवत पूजा अर्चना
करून
भक्तिमय वातावरणात मोठ्या दिमाखात करण्यात आले.
वेलगूर येथील ग्रामस्थांनी या सत्कार्याबद्दल काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार
यांचे आभार
मानले. शितल माता मंदिराचे लोकार्पण सोहळ्याला सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतु मडावी गीताताई चालूरकर माजी सभापती पंचायत समिती अहेरी,किशोर आत्राम सरपंच ग्रामपंचायत वेलगूर,उमेश मोहुर्ले उपसरपंच ग्रामपंचायत वेलगूर,रोहित गलबले सदस्य ग्रामपंचायत वेलगूर,अशोक येलमुले उपसरपंच ग्रामपंचायत किष्टापूर ,आशांना दुधी माजी सरपंच वेलगूर,अज्जू पठाण माजी सरपंच आलापली,नरेश गर्गम,आनंदराव मराठे,शंकर झाडे,केशर गलबले,रवी टेकाम ,दीपक चुनारकर,शामराव चौधरी,रवी गाऊत्रे,मारोती बावणे प्रमोद गोडशेवारसह आदी
सह गावकरी आणि भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित
होते.