आल्लापल्ली येथील जनआक्रोश मोर्च्यात जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी…
अहेरी : आलापल्ली येथे वीर बाबुराव शेडमाके चौकात लोकशाही पद्धतीने आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या जनआक्रोश मोर्चाला आदिवासी विध्यार्थी संघ,काँग्रेस पक्षाचे विधानसभा समन्वयक तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी सहभागी होत आपला सक्रिय पाठिंबा दर्शवीला.तसेच मोर्च्याला उपस्थित जन समुदायला मार्गदर्शनही केले.
परभणी येथील संविधान प्रकृतीची विटंबना,सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीसांच्या मारहाणीत झालेला मूत्यू आणि बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संसदेतील अपमान जनक वक्तत्व यांच्या विरोधात बाबुराव शेडमाके चौकात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आली. मोर्चाचे मंडप ठिकाणी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून उपस्थित मोर्चेकरुंसाठी अन्नदान कार्यक्रमही आयोजित करण्यात आ
ला हो
ता.
या मोर्चात
स्थानिक
महिला,पुरुष तसेच परिसरातील भीम भक्त मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.