अहेरी तालुका
‘त्या’ चार गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याची डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरु करा… अन्यथा आंदोलन उभारू…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी…
अहेरी : तालुक्यातीलअबनपल्ली,व्येंकाठरावपेठा,देवलमरी,मोदूमतुरा या चार गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याची काम खूप काही दिवसांअगोदर मंजूर झाले असून मात्र समंधित विभागाकडून या रस्त्याची काम आज पर्यंत सुरु करण्यात आले नाही.
परिणामी या चार गावातील नागरिकांना अहेरी तालुका मुख्यालयला येणे - जाणे करणे अडचणीचे ठरत आहे.तसेच शालेय विध्यार्थ्यांना,गर्भावती महिलांना या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.मंजूर असलेल्या रस्त्याची काम तात्काळ सुरु न केल्यास संबंधित विभागाविरुद्ध लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन उभारणार असल्याची माहिती आदिवासी विध्यार्थी संघ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्र समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी दिली आहे.