काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारत बांधकामाचे भूमिपूजन संपन्न…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी..
अहेरी : तालुक्यातील आवलमरी गावासाठी ग्रामपंचायत इमारती नव्हती.ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांकडून नवीन इमारत बांधकामासाठी जि.प.माजी अध्यक्ष यांच्याकडे मागणी होते.कंकडालवार हे जिल्हा परिषद अध्यक्ष असतांना त्यांनी जिल्हा परिषदे कडून नवीन ग्रामपंचायत भवन बांधकामासाठी साठी निधी मंजूर करून दिले होते.
ग्रामपंचायत इमारतीची भूमिपूजन आविसं,काँग्रेस समन्वयक अहेरी विधानसभा क्षेत्र तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.दरम्यान अजय कंकडालवार सत्ता असो किंवा नसो मी गावातल्या विकासासाठी कटिबद्ध असून येणाऱ्या काळात गाव प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन एकोप्याने काम करू असे आश्वासित केले.
या
भूमिपूजन सोहळ्याला आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अक्षय पोरतेट सरपंच ग्रामपंचायत आवलमरी,चिरंजीव चिलवेलवर उपसरपंच आवलमरी, देवाजी गंगाराम आत्राम सदस्य,सय्यांद्री आत्राम सदस्य,ममता कोरेत सदस्य,मारोती मडावी माजी सरपंच,ताशू शेख,धनंजय सूनतकर,मलय्या दोतुलवार, नानाजी मुरमाडे, अक्षय मुरमाडे, बालाजी आत्राम,वासुदेव आत्राम,सदाशिव तलाडी, वसंत तोर्रेम,मधुकर मडावी,बाबुराव आत्राम,अनिल सिडाम,वैकटेश गणपूरवार, चंदू जांपाल,मधुकर कोडापे,संतोष कंबगोनिवार, संतोष मडावी,जनार्धन छाटारे,भापु छटारे,मनोहर पागडे पो.पाटिलसह स्थानिक कार्यकर्ते तसेच
गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.