गोदाम अभावी खुल्या जागेवर तरी धान खरेदी करायला भाग पाडा…!धान उत्पादक शेतकऱ्यांची अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…. प्रतिनिधी..
एटापल्ली : तालुक्यातील हेडरी व उडेरा अंतर्गत येत असलेल्या कांदोळी येथील धान खरेदी केंद्राचे गोडाऊन पुर्ण भरले आहे.दोन तीन दिवस शेतकऱ्यांचे धान खरेदी केले गोडावून पूर्ण भरल्याने आता धान साठवून ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने हेडरी येथील शेतकऱ्यांना उडेरा येथे धान खरेदी केंद्रावर नेण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.म्हणून
खाली जागेत धान खरेदी केले जावे याकरिता आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्याकडे हेडरी - उडेरा येथील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
अहेरी उपविभागातील सर्वसामान्य जनतेच्या सुख
–दुःखात व सामान्य नागरिकांच्या
आणि शेतकऱ्यांच्या
समस्या
सोडवणूकीसाठी काँग्रेस नेते अजय कंकडालवार
सदैव
काम
करीत असतात. याची जाणीव सामान्य जनतेला असल्याने येथील जनता काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार
यांच्याकडे
आप- आपली
समस्या, गाऱ्हाने घेऊन
मोठ्या आशेने येत असतात.अन त्यावर कंकडालवार सकारात्मक तोडगा ही काढतात.
यावेळी निवेदन देतांना आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,रामा मडावी,डोलेश मडावी,संजय मडावी,कोको मडावी,रैनू नरोटे,लालसू आत्राम,पंजा मडावी,रैनू उसेंडी,सातू मडावी,मालू मडावी, इरपा आत्राम,गणू आत्राम,मधू मडावी,वारलू तलांडे,राजू मडावी,अशोक मडावी, बाबुराव आत्राम,महेश आत्राम,मनोज मडावी,साईनाथ मडावी,राजेश मडावी,लालू मडावी,बंडू मडावी,नरेश गर्गमसह स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच हेडरी – उडेरा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.