महागाव येथील युवकांना काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार कडून व्हॉलीबॉलचे क्रिडा साहित्य भेट…!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क… प्रतिनिधी…!
अहेरी : तालुक्यातील महागाव येथील युवकांना क्रीडा साहित्याची गरज होती.पण आर्थिक अडचणीमुळे हे क्रीडा साहित्य युवक घेऊ शकत नव्हते.काल येथील युवकांनी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा भेट घेऊन त्यांनी आपली व्हॉलीबाल क्रीडा साहित्य खरेदी करण्यामागील उद्भवणाऱ्या आर्थिक अडचण सांगितले होते.
काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक कंकडालवार यांनी त्या युवकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन युवकांना क्रीडा साहित्य खरेदी करून दिले.त्यामध्ये व्हॉलीबॉल,नेट आणि इतर काही वस्तू आहे.या साहित्यामुळे महागाव येथील क्रीडा युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.त्यावेळी गावातील समस्त क्रीडा युवकांनी अजयभाऊंची आभार मानले आहे.
जिल्ह्यातील खेळाडू खेळामध्ये मागे नाहीत मात्र खेळ शिकण्यासाठी खेळाचे साहित्य आवश्यक आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना खेळाचे साहित्य नसल्याने ग्रामीण भागातील युवक वर्ग खेळामध्ये मागे आहेत.प्रत्येक युवकांना खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे.याहेतूने व्हाॅलीबाॅल किट भेट देण्यात आल्याचे काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी सांगितले.
यावेळी महागाव ग्रामपंचायतचे सदस्य वंदना दुर्गे,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,कार्तिक तोगम,प्रमोद रामटेके,चंद्राजी रामटेके,भीमा पानेम,तुषार वेलादी,मल्लेश तलांडी,शाहिर वेलादी,अतुल दुर्गे,निखिल कोरेत,आकाश वेलादी,प्रकाश वेलादी,मनीष पानेम,अजय पानेमसह महागाव येथील युवक आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.