अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी..!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क….. प्रतिनिधी..
सिरोंचा तालुक्यात मागील दोन दिवस अचानकपणे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या अवकाळी पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मिरची व अन्य उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी आधीच मिरची व कापूसाला अत्यंत कमी भाव असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसामुळे दुहेरी फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांनी यंदा शेतीवर गुंतवणूक केलेली रक्कम देखील निघण्याची शक्यता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे.
म्हणून गडचिरोलीचे जिल्हाधिकाऱ्यांना सिरोंचाचे तहसीलदारां मार्फत तालुका काँग्रेस कमिटी कडून निवेदन पाठवून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी कांग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांनी केली.
सिरोंचाचे तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतांना सिरोंचाचे माजी उपसरपंच रवीभाऊ सल्लमवार, कांग्रेसचे जेष्ठ नेते समय्या चिलमूला, सडवली मेडिझेरला , मुनाफ शेख,अंकुलु कलकोटा आदि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.