सिपनपल्ली येथील शीतल माता मंदिराचे कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी..
भामरागड : तालुक्यातील सिपनपल्ली येथे माता मंदिर नसल्यामुळे येथील नागरिकांना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचण भासत होती.गावातल्या प्रत्येक कुटुंब आपल्या घरातल्या शुभकार्य हे सर्व प्रथम शीतल माता मंदिरत जावून पूजा अर्चना करून तदनंतर उर्वरित कार्यक्रम पार पाडत असतात.परंतु गावात शीतल माता मंदिर नसल्याने अडचण भासत होती.
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सिपनपल्ली येथील दौऱ्यावर असतांना येथील गावकर्यांनी शीतल माता मंदिर बांधून देण्याची त्यांना विनंती केले होते.गावाकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन अजयभाऊ कंकडालवार यांनी स्व:खर्चाने मंदिर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते.
कंकडालवार यांनी सिपनपल्ली येथील गावाकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार मंदिराचे बांधकाम स्व:खर्चाने बांधून दिले. शीतल माता मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याने आदिवासी विध्यार्थी संघ,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना करून लोकार्पण करण्यात आले.त्यावेळी येथील नागरिकांनी अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले. या लोकार्पण सोहळ्याला सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतु मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मडवेल्ली ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद मडावी,गडचिरोली राष्ट्रीय मानवधिकार संघटन जिल्हा अध्यक्ष महेश अलोणे, वेंकटी कोरेत,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,चिंनू सडमेक प्रतिष्ठित नागरिक मंनेराजाराम,प्रविण मोगरकर,आकाश मोगरकर,राकेश मडावी रोजगार सेवक,महेश कोडापे,रामू सडमेक,महेंद्र मडावी,गुरुदास सिडाम,अजित कोरेत,जयराम पेंदाम,राहुल मडावी,नितीन कोरेत,नरेश इस्टाम,राजेश इस्टाम,प्रदीप मडावी,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील महिला व पुरुष अन भक्तगणं मोठ्या संख्येने उपस्थित होते.