गडचिरोली जिल्हा

गडचिरोली येथील पर्यावरण विषयक जनसुनावणीला अजयभाऊ कंकडालवारांची उपस्थिती…!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…. प्रतिनिधी…

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील पहिलाच मोठा उद्योग असणाऱ्या वडलापेठ येथील प्रस्तावित ‘सुरजागड इस्पात’ या लोह प्रकल्पाची पर्यावरण विषयक जनसुनावणी मंगळवार दि.25 मार्च रोजी पार पडली.लॅायड्स मेटल्सनंतर आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात पाऊल ठेवणारा अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड हा दुसरा प्रकल्प आहे.

हा प्रकल्प सुरू करताना पर्यावरणाची हाणी होणार नाही यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातील आणि त्या भागातील नागरिकांना त्याबाबत काय वाटते हे जाणून घेण्यासाठी दि.25 ला ही पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली ही जनसुनावणीची बैठक पार पडली.

नियोजन भवनात जागा अपुरी पडेल याची कल्पना असल्याने भवना बाहेर सुद्धा मंडप टाकून मोठ्या पडद्यावर आतील चर्चा पाहण्याची सोय केली होती.या बैठकीत माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी चांगले रस्ते,आरोग्य,शिक्षण,बेरोजगार युवकांना रोजगार आदि समस्या सोडविण्याबाबत सुरजागड इस्पात कंपनीकडून अपेक्षा व्यक्त केली.

या पर्यावरण विषयक जनसुनावणीला परिसरातील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close
05:23