चंद्रपूर येथे जागतिक क्षयरोग दिवस संपन्न…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी…
24 मार्च जागतिक क्षयरोग दीन संपन्न चंद्रपूर:- दिनानिमित्त
जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर येथून क्षयरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सदर रॅलीचे उद्घाटन मान्य डॉक्टर भास्कर सोनारकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांनी डॉक्टर रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
डॉक्टर ललित कुमार पटले जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉक्टर प्रकाश साठे जिल्हा हिवताप अधिकारी, डॉक्टर मंगेश गुलवाडे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक चंद्रपूर डॉक्टर सौरभ राजूरकर चेस्ट फिजिशियन खाजगी वैद्यकीय व्यावसायिक चंद्रपूर डॉक्टर माधुरी टेंभे वैद्यकीय अधिकारी
सर्व मान्यवरांनी क्षय रोगाची शपथ घेऊन व हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. सदर रॅलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय २०० विद्यार्थी सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी व जिल्हा शहर व केंद्र येथील अधिकारी कर्मचारी सहभागी होते.
खाजगी डॉक्टर कडील निक्षय मित्र सौ. सोनाली पवन राजुरकर कोलते हॉस्पिटल, सौ. मीना रमेश मडपल्लीवार कोतपल्लिवार हॉस्पिटल,
कुमारी विद्या विजय खोब्रागडे नगराळे हॉस्पिटल, पंकज सुरेश काळपांडे बुक्कावार हॉस्पिटल, संदीप परशुराम बोरकर वासाडे हॉस्पिटल, बालकृष्ण रमेश वांढरे स्पर्श हॉस्पिटल ब्रह्मपुरी, विशाखा सुरेश मेंद गणवीर हॉस्पिटल ब्रह्मपुरी श्री रवींद्र श्रावण घाटे पीपीएसए दिशा फाउंडेशन फिल्ड ऑफिसर ब्रह्मपुरी या सर्व खाजगी क्षेत्रातील निक्षय मित्र यांनी टीबी रुग्णाची माहिती व रुग्णाची नोंदणीचे काम उत्कृष्ट केल्या बाबत माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व निक्षय मित्रांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र पीपीएसए प्रोग्रॅम, दिशा फाउंडेशन चंद्रपूर मार्फत देण्यात आले. सदर कार्यक्रम करिता दिशा फाउंडेशनचे श्री. वसंत आर. भलमे. प्रोग्राम ऑफिसर श्री. अविनाश सोमनाथे फील्ड ऑफिसर श्री. सुरेश पेटकर फील्ड ऑफिसर श्री संदीप मत्ते तसेच एनटीईपी स्टाफ यांनी यशस्वीपणे प्रयत्न केले.
24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 2025 मध्ये खाजगी शहरी भागात उत्कृष्ट टीबी नोटिफिकेशन केल्याबद्दल डॉक्टर सौरभ राजूरकर, डॉक्टर शरयू पाजारे, डॉक्टर आनंद बेंडले, डॉक्टर प्रवीण पंत, डॉक्टर अमरीश बुक्कावार यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे संचालन श्री हेमंत महाजन यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविव डॉक्टर ललितकुमार पटले सर यांनी केले, आभार प्रदर्शन माधुरी टेंभे मॅडम यांनी केले..