महाराष्ट्र सरकारने सुद्धा तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या धर्तीवर एस.सी. आरक्षणात वर्गीकरण करावं…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… प्रतिनिधी..
रवी सल्लमवार… सिरोंचा.
सिरोंचा.... सिरोंचा तालुक्यातील मादगी समाज संघटनेचे समाज बांधवानी तेलंगणा व आंध्रप्रदेशाच्या धर्तीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात सुद्धा एस.सी.आरक्षणाची वर्गीकरण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सिरोंचाचे तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून मादगी समाज संघटनेने वरील मागणी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात,1ऑगस्ट 2024 ला मा.सर्वोच्च न्यायालयाने अनु.जाती व अनु. जमाती आरक्षणात वर्गवारी करण्याची संवधानिक अधिकार दिला.सामाजिक,आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जाती जमातीनां आरक्षणाच्या लाभ उपलब्ध करून देणे हाँ त्याचा मूळ उद्धेश होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तेलंगणा व आंध्रप्रदेश या दोन्ही राज्यांनी एस.सी आरक्षणात वर्गीकरण करून मादगी समाजाला सामाजिक न्याय मिळवून दिले.म्हणून महाराष्ट्र सरकारने सुद्धा एस.सी
.आरक्षणा
त वर्गीकरण करून मादगी समाजाला सामाजिक न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
सिरोंचाचे तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना
निवेदन
पाठवितांना मादगी समाजाचे अंकुलू आतकुरी,कलकोटा अंकुलू,संपत
अंबाला,राजलिंगू
चिपेल्ली,श्रीधर
बिरेल्ली,बाणेश पुल्लूरी,चिलमूला मल्लय्या,सारय्या आईला,वेंकन्ना कलकोटा,तिरुपती चिलमूला
आदि उपस्थित होते.